गोरेगाव,दि.07ः-गाेरेगांव तालुक्यातील आदर्श सार्वजनिक वाचनालय माेहाडी ( तालुका ” अ ” दर्जा ग्रंथालय) चे संस्थापक सचिव व गाेंदिया जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव सेवानिवृत्त प्राचार्य यशवंत दादुजी चाैरागडे यांना सन 2016-2017 यावर्षाचा डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथमित्र पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्यावतीने जाहिर करण्यात आला आहे.हा पुरस्कार येत्या 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व राेख रक्कम असे आहे.
चाैरागडे हे मागील 40 वर्षापासुन ग्रंथालय चळवळीत अग्रेसर असुन जिल्हा, तालुकातील नवीन ग्रंथालय यांना मान्यता, दर्जा वाढ इत्यादी विषयी सदैव मार्गदर्शन व सल्ला देण्याचे कार्य करीत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





