27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home शैक्षणिक यूथ फाॅर जत संस्थेचे संस्थापक अजय पवारांची बाबरवस्ती शाळेला भेट

यूथ फाॅर जत संस्थेचे संस्थापक अजय पवारांची बाबरवस्ती शाळेला भेट

0
30

जत,दि.07ः- सांगली जिल्ह्यातील यूथ फॉर जत संस्थेचे संस्थापक अजय पवार ( इंग्लड येथे सॉफ्ट वेअर इंजिनिअर) व त्यांचे सहकारी अमित बामणे यांनी 5 सप्टेंबरला बाबरवस्ती जि.प. शाळेस भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाठी कार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शाळेतील विदयार्थांशी संवाद साधत त्यांनी चिकाटीने अभ्यास करून ध्येय गाठण्याचा मार्गदर्शन केले.मुलांना इ-लर्निंग द्वारे डिजिटल वर्गाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मुलांना सॉफ्टवेअर फार आवडल्याने तो सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे.