27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ लाखांदूर तालुक्यात पावसामुळे अनेक घरांचे नुकसान

लाखांदूर तालुक्यात पावसामुळे अनेक घरांचे नुकसान

0
37
लाखांदूर,दि.07:– तालुक्यात ६ सप्टेंबर रोजी  आलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड सुरु झाली आहे.काही भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक बंद पडल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले आहे.सततच्या पावसामुळे खैरना,कुंडेगाव, चीचोली,अंतरगाव,गवराला,असोला,मोहरना,सोनी,इदोरा,विरली, सरांडी, बारव्हा,दिघोरी परिसरात जनजीवन विस्कळीत झाले,तर अनेक मार्ग बंद आहेत. तालुक्यातील अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. स्थानिक पातळीव शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.