24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ दुर्बल घटकाची आर्थिक प्रगती हेच आमचे ध्येय- डाॅ. एस. एच. भैरम

दुर्बल घटकाची आर्थिक प्रगती हेच आमचे ध्येय- डाॅ. एस. एच. भैरम

0
28

गोरेगाव,दि.10- श्री. पोवार बिगर शेती पतसंस्था गोरेगावच्या वार्षिक आमसभेचे आयोजन जगत महाविद्यालयाच्या सभागृहात केले होते. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी श्री.पोवार बिगर शेती पतसंस्था गोरेगाव संचालक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. एस. एच. भैरम होते तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव आर. डी. कटरे,उपाध्यक्ष सौ.भोजवंताबाई पटले,संचालक . के.एच.बिसेन, रामेश्वर हरिणखेडे,श्री. सुधीर येळे,राहुल कटरे, राजेंद्र पटले, लालचंद धानगाये,जगदीश बोपचे,एन.बी.रहांगडाले, भाऊलाल गौतम प्रामुख्याने उपस्थित होते. आमसभेचे औचित्य साधून आर. डी. कटरे यांनी 2018-19चा जमाखर्च व पत संस्थेची कार्यपद्धती यावर प्रकाश टाकला . अध्यक्षीय भाषणातून पतसंस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस.एच. भैरम यांनी’ राष्ट्राची प्रगती करावयाची असेल तर सर्व समाजातील शेतकरी,शेतमजूर,दुर्बल घटक यांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे याच उद्दीष्टपूर्तीकरीता पत संस्थाची भूमिका फार महत्वाची आहे हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून श्री.पोवार बिगर शेती पतसंस्था गोरेगाव कार्य करीत आहे ‘असे मौलिक विधान व्यक्त केले. या आमसभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते. संचालन भाऊलाल गौतम यांनी केले.