24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ पोलिस अधीक्षकांची पूरग्रस्त कोठी गावाला भेट

पोलिस अधीक्षकांची पूरग्रस्त कोठी गावाला भेट

0
32

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.10 – जिल्यात गेल्या चार पाच दिवसांपासून कोसळणाºया अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडूंब भरून वाहत आहेत.भामरागड तालुक्याच्या आजही संपर्क इतर गावांशी तुटलेला आहे.या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच सोमवारला(दि.09) पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे पोलिस अधीक्षकांनी पाण्याने वेढलेल्या पूरग्रस्त अतिदुर्गम कोठी गावाला पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांनी भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेतली.

यावेळी कोठी येथील नागरिकांनी पूरपरिस्थितीमुळे गावाचे झालेले नुकसान तसेच पुरामुळे निर्माण झालेल्या समस्या पोलिस अधीक्षकांसमोर मांडल्या. कोठी येथील दोन ग्रामस्थांच्या घरांची पडझड झाल्याने त्यांना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी नागरिकांना धीर देत गडचिरोली पोलिस दल तसेच जिल्हा प्रशासन आपल्या सर्वांच्या पाठिशी असून आपल्याला या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांना दिले.