26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ रेस्कू पथकाने पाण्यात अडकलेल्या कुटूंबाना बाहेर काढले

रेस्कू पथकाने पाण्यात अडकलेल्या कुटूंबाना बाहेर काढले

0
44

गोंदिया,दि.10- जिल्हयात मागील आठ दिवसापासून संततधार पडलेल्या पावसामुळे जिल्हयातील धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे ८ सप्टेंबर रोजी पुजारीटोला धरणाचे सहा तसेच मध्यप्रदेशातील भिमसागर डॅम धरणाचे ९ दरवाजे उघडल्याने बाघ तसेच वैनंगगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने रजेगाव, बिरसोला, कासा,तेढवा, डांगोरली हे गाव नदीकाठावर असल्याने रात्रपासून पोलीसांची गस्त ठेवण्यात आली होती तसेच गावकèयांना सुरक्षीत स्थळी राहण्याबाबत सुचना देवून सतर्क करण्यात आले होते.किडंगीपार/ ढिवरटोला या गावातील 106 नागरिकांना रेस्क्यू च्या माध्यमातून 13-13 फेऱ्या लावून काढण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.

ग्राम बिरसोला गावातील एक परिवार रेल्वे पटरीच्या कासा रोडला लागून असलेल्या आपल्या शेतात राहत असून रात्री अचानक पाण्याची पातळी वाढल्याने त्या घरात राहणारे ठगनबाई मात्रे (६०), कुमारीबाई कृष्णकुमार मात्रे (३५), कु.निकिता (१०), कु. दिव्या (७), मुलगा सामीयल (३) असे आजी, सुन व नातवंडे सह रात्रपासून शेतातील आपल्या घरात चहुबाजूने पाण्यात अडकून पडले होते त्यांना आज ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले असून सर्व ५ सदस्य व जनावरे यांना सुखरूप पाण्याचे बाहेर काढण्यात आले.

रेस्कू ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक बांगडे पोलीस स्टेशन रावणवाडी, पोशि दिपक देशभ्रतार, पोना शेखर पटले, सैनिक भरत बिसेन, काटी पोलीस पाटील भूषण उके, बिरसोला पोलीस पाटील दिलीप तुरकर, बिरसोला तलाठी वालोदे, ग्रामपंचायत सदस्य डॉ.देवा जमरे, गावातील नागरिक कबीर नागफासे, रामप्रसाद पाचे, महेंद्र ठाकरे यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.किन्ही येथील रेस्क्यू ऑपरेशन मध्ये किशोर टेभुंर्णे,राजकुमार बोपचे,जसवंत राहंगडाले,धिरज दुबे,रविन्द्र भंडारकर,चुन्नीलाल मुटकुरे,इंद्रकुमार बिसेन,अनील नागपूरे,चंद्रशेखर बिसेन,चालक मुरलीधर मुदोड़कर तर किडंगीपार (ढिवरटोला) येथील रेस्कू आपरेशनमध्ये सुभाष कश्यप,नरेश उइके,इमरान सय्यद,रूपेंद्र गौतम,संदीप कराडे,गिरधारी पतैहे,जबराम चिखलोंडे,बाबरे,गजभिये, चालक जावेद पठान यांचा समावेश होता.