भंडारा,दि.10ः– ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना पोलीस भरती व इतर कार्यालयीन भरती प्रकियेमध्ये ५२ ट्नके आरक्षण लागू करण्यासाठी ओबीसी छावा संग्राम परिषदेच्या वतीने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) दि. ४ जुलै २०१९) च्या आदेशान्वये पोलीस शिपाई संवर्गातील र्नित पद भरण्याकरीता काढलेल्या जाहिरातीमध्ये नागपूर शहर २७१, भंडारा जिल्हयात २२ जागा भरण्यात येणार असून ओबीसीप्रवर्गातील उमेदवारांसाठी एकही जागा आरक्षित नाही.
हा सर्व ओबीसींवर शासनाने केलेला अन्याय आता सहन केला जाणार नाही. भारतीय घटनेच्या कलम ३४० नुसार इतर मागासवर्गातील लोकांना दिलेल्या अधिकाराची शासन पायमल्ली करीत आहे. शासनाच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध यावेळी आंदोलकांनी केला. ओबीसी आरक्षणाला ध्नका लावल्यास ओबीसी समाज पेटून उठल्याशिवार राहणार नाही, असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला.ओबीसींवर शासन सतत अन्याय करीत आहे. ओबीसींच्या नोकèया बंद करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे.क्लासवनच्या नोकèयांवर क्रिमिलिअरची घटनाविरोधी अट लादण्यात येवून ओबीसींच्या नोकèया संपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ओबीसी समाज अन्याय खपवून घेण्याच्या मानसिकतेत नाही. ओबीसींवर अन्याय करणाèयांना धडा शिकविण्यासाठी ओबीसी संघटीत व आंदोलक झालेला आहे. त्यामुळे होणाèया परिणामास शासन जबाबदार राहील, असा दम यावेळी भरण्यात आला. आंदोलनादरम्यान ओबीसी छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष आजबले, जिल्हा महामंत्री बालू (गणेश) ठवकर, भंडारा तालुकाध्यक्ष दर्शन भोदे, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष सदानंद इलमे, ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते, सुकराम देशकर, ओबीसी सेवा संघाचे भैय्याजी लांबट, अन्याय निवारण समितीचे भगीरथ धोटे, ओबीसी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष के.झेड. शेंडे, हिवराज उके व ओबीसींचे अन्य नेते तसेच पदाधिकारी व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





