गोंदिया,दि.10:राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुक्यातील खमारी येथे तयार केलेल्या ५ कोटी रुपयातून तयार झालेल्या आरोग्य केंद्र तसेच वेयर हाऊस डीपीएमयुचे लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी होत्या.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून या मतदारसंघाचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल ,आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले,महिला बालकल्याणसभापती लता दोनोडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,जिल्हा परिषद सदस्य विमल नागपूरे,माजी सभापती जगदिश बहेकार,स्नेहा गौतम,पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे,उपसभापती चमनलाल बिसेन,जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे, सुरजलाल महारवाडे, विजय लोणारे,सुनीता दोनोडे, योगराज उपराडे,इंद्रायणी धावडे, सरपंच आशा तावाडे, कैलाश साखरे, योगराज ठाकरे,विरेंद्र अंजनकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका वैद्यकीय अधिकारी चौरागडे यांनी केले.





