29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ आता पूरपरिस्थितीनंतर ‘मिशन भामरागड’

आता पूरपरिस्थितीनंतर ‘मिशन भामरागड’

0
33

रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची टीम मदतीला

गडचिरोली,दि.११: सलग सहा ते सात दिवस पूरपरिस्थितीला तोंड दिलेल्या भामरागड तालुक्यातील नागरिकांना आरोग्याबाबत मदतीसाठी ङ्कमिशन भामरागडङ्क अभियान आरोग्य विभागाकडून सुरु करण्यात आले आहे. स्वईच्छेने ४७ आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची टीम भामरागड येथे आज रोग प्रतिबंधात्मक उपाययोनांसाठी रवाना झाली. दि. ११ ते १३ सप्टें. दरम्यान भामरागड तालुक्यातील ग्रामीण भागात ही टीम आरोग्य सेवा देणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण भागातील दुर्गम गावांमध्ये पूरपरिस्थितीनंतर उपाययोजना करण्याच्या सुचना दोन दिवसांपुर्वीच सर्व प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातूनच जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची यादी अंतिम करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी याबाबत आरोग्य विभागाच्या नाविण्यपुर्ण उपक्रमाला पाठबळ दिले. यातून आज ४७ लोकांची आरोग्य टीम भामरागडसाठी रवाना झाली.
भामरागड तालुक्यातील १२८ गावांमध्ये आरोग्य विषयक सेवा देणे यामध्ये प्राथमिक औषधोपचार, रोगप्रतिबंधात्क उपाययोजना, जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच आवश्यक तातडीची मदत लागेल त्याठिकाणी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय यांची मदत घेतली जाणार आहे. प्रशासनाकडून देण्यात येणारे पुरग्रस्तांचे साहित्य वाटप यासाठीही ही टीम काम करणार आहे.
जिल्हास्तरावरील जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल मडावी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुपम महेश गौरी यांचा समावेश या टीममध्ये आहे. तसेच ४ तालुका आरोग्य अधिकारी, ८ वैद्यकीय अधिकारी, २८ आरोग्य सहाय्यक (पुरुष) व आरोग्य सेवक यांचा समावेश या टीममध्ये करण्यात आला आहे.