29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ उद्योजक महिला आजच्या काळाची गरज!-आमदार संजय पुराम

उद्योजक महिला आजच्या काळाची गरज!-आमदार संजय पुराम

0
217

देवरी,दि.११: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या वतीने जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना, नियोजन विभाग महाराष्ट्र शासन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने नारीचेतना लोक संचालित साधन केंद्र , देवरी आफताब मंगल कार्यालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याला आ.संजयजी पुराम आमदार आमगाव- देवरी तथा समिती प्रमुख, अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र शासन (राज्यमंत्री दर्जा) यांनी संबोधित केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, स्थापित नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरीची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी श्रीमती उषाताई शहारे ह्न सदस्या जि.प. गोंदिया या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सभापती श्रीमती सुनंदा बहेकार, श्रीमती कौशल्याताई कुंभरे- नगराध्यक्ष देवरी, गणेशदास सोनबोईर ह्न उपसभापती पं.स.देवरी, श्री. प्रवीण दहीकर ह्न नगरसेवक, देवरी. ठाकरे- नायब तहसीलदार,देवरी. मार्गदर्शक म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक उदय खर्डेणवीस व श्रीमती सविताताई बेदरकर सामाजिक कार्यकर्त्या इ. उपस्थित होते.
श्री.पुराम पुढे म्हणाले, माझ्या शिक्षणासाठी मी, देवरी ते भंडारा एस.टी.बसने प्रवास करायचो माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत. महिलांच्या उद्योगाकरिता बँकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुराम यांनी केले. कारण प्रत्येकाच्या जीवन सुरक्षेची हमी शासनाने घेतली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे असून महिलांनी आता आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही असे समजून काम करावे असे त्यांनी सांगितले. माविमच्या माध्यमातून हजारो बचत गटाच्या महिलांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. संजय पुराम यांनी समृद्धी कुक्कुटपालन व्यवसाय पासून सुरवात केली आणि ते म्हणाले कि, मी, कोंबड्या विकता-विकता आमदार बनलो त्यामुळे आपण सर्व माता भगिनिनी व्यवसायाकडे वळावे. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु करावेत मी, आमदार म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर त्यासाठी नक्की प्रयत्न करणार.
आ.संजयजी पुराम यांच्या हस्ते सुशीला कुरसुंगे, जेठभावडा ,डीलेश्वरी बिंझाडे, देवरी., सुलोचना राउत, चारभाटा. कुंदा दिघोरे, देवरी, सुशीला मरसकोल्हे, चारभाटा, सोनिया माटे, देवरी, मंदा करमकार, चारभाटा. ममता कोराम, मासुलकसा. प्रमिला मोह्बे, सावली. असे एकूण १० बचत गटातील महिलांना डिजिटल आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त करता यावे याकरिता ऑक्सिजन मायक्रो ए.टी.एम मशीन व सायकल चे वाटप करण्यात आले.

उदय खर्डेवीस यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. परिश्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या बचत केली पाहिजे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती घेण्यास पुढे यावे.
सभापती श्रीमती सुनंदा बहेकार- म्हणाल्या कि मी, सुद्धा बचत गटाची सदस्य होती आणि आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा देवरीच्या मार्फत ६ बचतगटांना, आणि वैयक्तिक ७ महिलांना प्रत्येकी ५० हजार रुपये , २ महिलांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे, तसेच ॠऊउउ बँकेच्या माध्यमातून प्रयास म.ब.गटाला ५ लाख रुपये व जागृती म.ब.गट यांना २ लाख ३० हजार रुपये कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसिल कार्यालय देवरीच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी मतदान जन-जागृती करिता व्ही.व्ही.पट (इव्हिम) मशीनचे प्रात्यक्षिक महिलांना करून दाखवण्यात आले. मतदान कसे करावे याबाबत समुपदेशन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरी एक पाउल यशाचे या अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवरी तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित लोक संचालित केंद्रा मार्फत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून उत्पादित केलेल्या वस्तुंच्या मार्केटींगबाबत माहिती जाणून घेतली. व त्यांना त्याकरिता प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रदिप कुकडकर, प्रफुल अवघड, नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्र, देवरी टिम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मानले. संचालन प्रदीप कुकडकर सनियंत्रण अधिकारी यांनी केले.