वाशिम, दि. १4 : पोहरादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक-भक्तांना व परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
पोहरादेवी येथे श्रेणीवर्धीत ग्रामीण रुग्णालयाकरिता शासकीय इमारत उपलब्ध आहे. त्यामुळे पदनिर्मितीसाठी स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. पोहरादेवी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, याकरिता पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केला होता.




