30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ माजी आमदार हरिष मोरे यांचे निधन

माजी आमदार हरिष मोरे यांचे निधन

0
56

तिरोडा,दि.१७ः- मातंग समाजाचे वरिष्ठ नेते आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार हरिष मोरे यांचे आज मंगळवारला नागपूरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते.१९८५ ते ९५ पर्यंत ते काँग्रेसकडून आमदार राहिले.त्यानंतर गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली असता पहिल्या जिल्हा परिषदेत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून आले होते.आमदारकीच्या कार्यकाळातच सामाजिक प्रश्नाला घेऊन सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत चर्चेदरम्यान मतभेद झाले असता त्यांनी त्यावेळी नाईक यांच्यावर चप्पल भिरकावल्याने ते पुर्ण महाराष्ट्रात परिचित झाले होते.त्या काळात त्यांनी काही वेळ निलqबत करण्यात आले होते.त्यानंतर त्यानी काँग्रेस सोडली होती.शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तिरोड्यात दोन शाळा सुरु केलेल्या होत्या.त्यापैकी एक मुलीसांठी होती.तर तिरोडा येथे बसस्थानक आणि एमआयडीसीच्या जागेचा प्रश्न त्यांच्या कार्यकाळात सुटलेला होता.अण्णाभाऊ साठे महामंडळ हे स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळेच महात्मा फुले महामंडळापासून अण्णाभाऊ साठे महामंडळ हे स्वतंत्र करण्यात आले होते.दरम्यान त्यांनी राजकारणात भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेत काम केले.२०१९ च्या लोकसभेच्या वेळी मात्र त्यांनी साकोली येथील राष्ट्रŸवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मंच घेतल्याने भाजपने त्यांच्याशी फारकत घेतली होती.सर्व सामान्यांच्या हक्कासाठी लढणारे असे हरिष मोरे त्यांची ओळख होती.कधीही त्यांनी मोठेपणाचा आव न आणता साधेपणाने आपले आयुष्य काढले.आज मंगळवारला त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर तिरोडा येथील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंंस्कार करण्यात आले.यावेळी मतदारसंघातील आजी माजी लोकप्रतिनिधीसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.