गोंदिया,दि.23 : विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेत बदल करण्यात आले होते.त्यात प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.म. अमरावती येथील राम अरुण लंके यांची गोंदिया उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली होती.त्यांनी 19 सप्टेंबरला आपल्या पदाचा कार्यभारही स्विकारला होता.मात्र एक आठवड्याचा काळ त्यांच्या पदस्विकारण्याला होत नाही,तोच पुन्हा 22 सप्टेंबरला नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी शिरिष पांडे यांची गोंदियाचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली आदेश काढण्यात आले आहेत.पांडे यांनी बदली आदेश निघताच तत्काळ रुजू होण्याचे आदेश निवडणुक कारणास्तव देण्यात आले. मात्र लंके यांचे लगेच झालेले स्थानांतरण हे चर्चेचे विषय ठरले आहे.




