वाशिम, दि. २५ : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी यांना द्यावी, असे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५, भ्रमणध्वनी क्र. ७४२०९३३९४३), वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००, भ्रमणध्वनी क्र. ९८२३२२७७४१), वाशिम ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००, भ्रमणध्वनी क्र. ८९७५४४४८००), रिसोडचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६, भ्रमणध्वनी क्र. ८५५१९६२६२०), मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३, भ्रमणध्वनी क्र. ९६६७१०९४५९), शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७४००३, भ्रमणध्वनी क्र. ९९२१००४२८८), मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०६६२, भ्रमणध्वनी क्र. ७०२०२१८५१७), मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०३३३, भ्रमणध्वनी क्र. ९८९०१७६६६४), अनसिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बनसोड (दूरध्वनी क्र. ०७२५२-२२६०३४, भ्रमणध्वनी क्र. ९७६३७०१७२०), आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंपणे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३५५५८, भ्रमणध्वनी क्र. ७३५०१८१४९९), जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधवर (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७२०१६), भ्रमणध्वनी क्र. ९८८१४६३३६५), कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२००८, भ्रमणध्वनी क्र. ९८२३९९५००१), कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२१००, भ्रमणध्वनी क्र. ७७२२०३५२०९), कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२४००, भ्रमणध्वनी क्र. ८८०६०७३०९०), मानोराचे पोलीस निरीक्षक शिशिर मानकर (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३३२२९, भ्रमणध्वनीक्र. ९८२३२३०६१४), धनजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तसरे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२३२०३०, भ्रमणध्वनी क्र. ८४८२९४३६९६) या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण (भ्रमणध्वनी क्र. ७७०९९७५९०६, दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२७५५, ई-मेल आयडी : [email protected], [email protected]) असून गृह शाखेचे पोलीस उप अधीक्षक यशवंत केडगे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३१३५५, भ्रमणध्वनी क्र. ९९२३०४३४२२, ई-मेल आयडी : [email protected]) हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे (दूरध्वनी क्र. ०७२१-२५६३५९३, फॅक्स क्र. ०७२१-२५६३५९७, ई-मेल आयडी : [email protected]) हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस अथवा [email protected] या ई-मेलवर संदेश पाठवू शकतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




