29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ Sweep अंतर्गत सटवा शाळेत मतदान जागृती संदर्भात निबंध, चित्रकला स्पर्धा

Sweep अंतर्गत सटवा शाळेत मतदान जागृती संदर्भात निबंध, चित्रकला स्पर्धा

0
81

गोरेगाव,दि.27ः- तालुक्यातील सटवा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान संदर्भात जनजागृती करण्यासाठी चित्रकला तसेच निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श मतदान कक्ष आणि मतदान करतानाचें चित्रं यावर विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बीजेवार, बीएलओ पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, शाळेतील शिक्षक उपस्थित होते.तर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माझा मत माझा अधिकार, लोकशाहीत मतदानाचे महत्व, बळकट लोकशाहीसाठी शंभर टक्के मतदान या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बीजेवार, पाणी व स्वच्छता विभागाचे शालेय स्वच्छता सल्लागार श्री रहांगडाले व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. चित्रकला व निबंध स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 8 वी च्या 22 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. शालेय पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात येऊन त्यांचे चित्रकला व निबंध तालुकास्तरावर पाठविण्यात आले आहे.