29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ औषधनिर्माण संघटनेच्यावतीने फार्मासिस्ट दिवस साजरा

औषधनिर्माण संघटनेच्यावतीने फार्मासिस्ट दिवस साजरा

0
29

गोंदिया,दि.27ः- येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिवस गोंदिया जिल्हा औषधनिर्माण संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन कापसे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य उपसंचालक डॉ.रवि धकाते,डॉ.ए.डी.चांदेवार,श्री.लोखंडे,मुख्य औषध निर्माण अधिकारी येळणे उपस्थित होते.सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी गभणे,गजभिये,हुमणे यांचा सत्कार करण्यात आळा.कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता ज्योती पडपय्या,शरद रहागंडाले,राजेश चव्हाण,पराग साळवे,विनोद पटले,दिलीप येळणे,खुणे,दहिवले,महेंद्र पटले,भुपेश तुरकर,प्रविण टेकाडे,गणेश दलाल,श्रीमती कुंभलकर,गाढवे,अंजु कावळे यांच्यासह औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.