25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ निवडणूक खर्चाच्या निरीक्षणाकरीता ‘खर्च निरीक्षक’ जिल्हयात दाखल

निवडणूक खर्चाच्या निरीक्षणाकरीता ‘खर्च निरीक्षक’ जिल्हयात दाखल

0
24

अभ्र घोष यांची गडचिरोली विधानसभा मतदार संघ कार्यालयाला भेट
गडचिरोली दि.२८: उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाचे निरीक्षण करण्यासाठी खर्च निरीक्षकांची आयोगाकडून गडचिरोली जिल्हयातील मतदारसंघाकरीता नेमणुक करण्यात आली आहे. या नुसार गडचिरोली येथे निवडणुक आयोगाकडून अभ्र घोष, यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान एक खर्च निरीक्षक असतो. खर्च निरीक्षक, निवडणुकीच्या अधिसूचनेच्या दिवशी तसेच इतर ३ पूर्ण दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात पाहणी करतात तसेच ते पुर्ण निवडणुक प्रक्रियेदरम्यान जिल्हयात उपस्थित राहणार आहेत. अभ्र घोष हे निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करण्याचे काम करणाऱ्या सर्व चमूंना भेटी देणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक (एस.पी.) पोलीस खात्याच्या मध्यस्थ अधिकारी, आयकर व राज्य उत्पादनशुल्क व इतर अंमलबजावणी अभिकरणे यांच्याशी समन्वय साधून कार्य करणार आहेत.
खर्च निरीक्षक निकाल जाहीर झाल्यापासून २५ दिवसांनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यास भेट देणार आणि निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांच्या (हिशेबांच्या) विवरणपत्रांची छाननी करण्यामध्ये, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास साहाय्य करणे हे त्यांचे कार्य आहे. खर्च निरीक्षक हे, निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करण्याच्या बाबतीत आयोगाचे डोळे व कान आहेत. खर्च निरीक्षक, मतदारसंघामधील संपूर्ण निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करण्याच्या कामावर असलेल्या कर्मचारी वर्गावर देखरेख व त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. ते निवडणूक खर्चाच्या संनियंत्रणाचे काम करणाऱ्या सर्व चमूंच्या कामाची तपासणी करणार आहेत आणि जेव्हा केव्हा कोणत्याही चमूच्या कामामध्ये हलगर्जीपणा किंवा अनियमितता असेल तेव्हा, ते ही बाब जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी यांना, खर्च निरीक्षकांच्या शिफारशीवरून तात्काळ सुधारात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. प्रचाराच्या कालावधीत, किमान तीन वेळा, प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी केली जाणार आहे. आज विविध भेटीत त्यांच्या बरोबर जिल्हा परिषद कॅफो विकास सावंत उपस्थित होते.
चौकट : अभ्र घोष, खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांच्या खर्चाबाबत काही तक्ररी असल्यास किंवा माहिती हवी त्यांच्या ८२७५२३७१५५ मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.