जिल्हयातील ४५० कॅम्पस ऍम्बेसेडर मार्फत मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम
गोंदिया, दि.२८: भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे जिल्हयात स्वीप (SVEEP- Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत सामान्य मतदारांपर्यंत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम तसेच मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम सूरु असुन नागरीकांनकडुण उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच ‘स्वीप‘ हा कार्यक्रम मतदारांच्या अधिकाराची जाणीव करुनदेणारा कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन दिनांक २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी केले.
स्वीप कार्यक्रम अंतर्गत न.मा.द महाविद्यालय तथा धोटेबंधु विज्ञान माहाविद्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले असुन येथिल १ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांची नावे मतदार यादीत शोधण्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच जिल्हयातील शाळा/महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी ४५० कॅम्पस ऍम्बेसेडर मार्फत मतदारयादी वाचन कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, व्याख्यानमाला कार्यक्रम, प्रभातफेरी, दिव्यांग मतदारांसंबंधी विशेष सुविधा व नवमतदार नोंदणी कार्यक्रम, मतदारयादीत आपल्या नाव शोधणे/पाहणी करणे, जनजागृती रॅली काढणे, सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, शार्ट फिल्म, स्लोगन स्पर्धा, मानवश्रृंखला तयार करणे, संकल्प पत्र स्वाक्षरी इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. टप्या-टप्यातून विविध घटकांपर्यंत या कार्यक्रमच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हयात डतएएझ कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी व मतप्रतिशत वाढविण्यासाठी जनजागृतीचे कार्य करण्यात येत असुन जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी दिव्यांग मतदारांसाठी निवडणुक आयोगाने दिलेल्या विविध सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहे. तसेच येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना मतदानाचा हक्क वाजविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
तक्रारनिवारणाठी ऽ १९५० टोल फ्री क्रमांक डायल करा
निवडणूक प्रकियेत मतदार हा लोकशाहीची आत्मा असून विविध प्रकारच्या सोई-सुविधा मतदारांना उपलब्ध करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमिवर निवडणूक प्रक्रिया सुलभरीत्या पार पाडण्यासाठी तसेच नव-मतदारांच्या विविध समस्या व शंका निरसन करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत जिल्हा संपर्क केद्र उभारुन टोल फ्री क्रमांक ऽ १९५० कार्यान्वित केले आहे.
बैंकेतील खाते व्यवहारावर नजर ठेवावे : जिल्हाधिकारी
येत्या निवडणुकीत बैंकेखोतेचे गैरवापर होऊ नये या साठी सर्व बैंकेने संशयीत खात्यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा बैंकर्स समन्वय समिमीच्या सभेत जिल्हाधिकारी यांनी दिले. सदर सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बैंकखात्यामध्ये १ लक्ष किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत जिल्हा निवडणुक अधिकारी यांना सुचित करणे सबंधी सर्व बैंकांना निर्देष देण्यात आले. या निवडणुकीत उम्मेदवारांना निवडणुकीसंबंधी २८ लक्ष रुपयेची मर्यादा देण्यात आली आहे याबाबत सर्व व्यवहार बैंकेतुन चेक/एन.ई.एफ.टी/आ.टी.जी.एस किंवा ऑनलाईन करणे बंधनकारक आहे. तसेच निवडणुकीत उम्मेदवारांचे खाते उघडण्यासंबंधी सर्व बैंकाना निर्देश देण्यात आले आहे.




