27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे 118 घरांचे व 27 गोठयांचे

गोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे 118 घरांचे व 27 गोठयांचे

0
46

गोरेगाव,दि.29 : जिल्ह्यात एकूण आज तारखेला पडलेला पावसाच्या 87% टक्के पाऊस पडलेला आहे.तालुक्यात २८ सप्टेंबरच्या सकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाने तालुक्याला झोडपून काढले. अतिवृष्टी पडल्याने अनेक घरांची पडझड झाली. तर धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंडकेपार येथील रमेशराव चौधरी यांचे घर कोसळल्याने या आदिवासी कुटुबाला सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान पोहोचले आहे. त्याचप्रमाणे धानाचे उभे पिक खाली पडल्याने शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. तात्काळ पिडीत कुटुंब व नुकसानग्रस्त शेतकºयांचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. झालेल्या अतिवृष्टि मुळे 118 घरांचे व 27 गोठयांचे अंशतः नुकसान झालेले आहे
शनिवारच्या सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी, गोरेगाव मंडळामध्ये अतिवृष्टी दर्ज करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे अनेक घर व गोठ्यांची पडझड झाली. त्याचप्रमाणे धानाचे उभे पिकसुद्धा जमिनीवर पसरले. या अतिवृष्टीमुळे शेतकºयांना फार नुकसान झाले आहे. पिंडकेपार येथील रमेश चौधरी यांचे घर मध्यरात्री कोसळल्याने मोटारसायकल, सायकल, भांडे व अतिआवश्यश्क वस्तूंचे नुकसान झाले. या घटनेत सुमारे पिडीत कुटुंबाला सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली आहे. मागणी करण्यात आली आहे की, तात्काळ घटनेचा पंचनामा करून पिडीत कुटुंब व नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक देण्यात यावी.

गोंदिया जिल्ह्यात दिनांक 29/09/19 रोजी अतिवृष्टी झालेल्या मंडळ आणि तालुक्यांची माहिती एकूण 5 मंडळ आणि 1 तालुका

A.गोरेगाव तालुक्यातील 3 पैकी मंडळ 2
1. गोरेगाव-114.00 mm
2. कुऱ्हाडी-83.20 mm

गोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद – 75.20 मि मी

B. आमगाव तालुक्यातील 4 पैकी 2 मंडळ
1.आमगाव -78.80 mm
2.ठाणा -90.30 mm

C. तिरोडा तालुक्यातील 5 पैकी 1 मंडळ
1. वडेगाव -68.80 mm