- जिल्हा परिषद सभागृहात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
- जिल्हा परिषद ते गणेशपूर ग्रामपंचायत पर्यंत प्लास्टिक संकलनासाठी निघाली स्वच्छता रॅली
- प्लास्टिक संकलन करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्या देवून गौरव
भंडारा, दि. 3:- स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानांतर्गत महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर ला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष,जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपस्थिती अधिकारी व कर्मचारी यांना प्लॉस्टीक मुक्तीची शपथ देवून प्लॉस्टीकचा कचरा घरून गोळा करून आणलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचा कापडी पिशव्यां देवून गौरव करण्यात आला. तदनंतर जिल्हा परिषद परिसर, मिशन स्कुल मैदान, जिल्हा परिषद ते गणेशपूर ग्राम पंचायत रस्ता तसेच आठवडी बाजार परिसरात प्लॉस्टीक कच-यांच्या संकलनासाठी महाश्रमदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या महाश्रमदानात प्लॉस्टीक कचरा गोळा करण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांचे शेकडो हाज एकवटले होते.
जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री रवींद्र जगताप ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपवनसंरक्षक श्री विवेक होशिंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), (पाणी व स्वच्छता) सौ. मंजुषा ठवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) मनिषा कुरसंगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री पाच्छापुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोटघरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सौ. डोंगरे मॅडम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, उपकार्यकारी अभियंता श्री पाटील तसेच अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांना मा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. प्रत्येकांनी आपले घरी कापडी पिशव्यांचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आवाहन केले. स्वत:चे घरापासून प्लॉस्टीक पिशव्या गोळा करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या अधिकारी- कर्मचा-यांना कापडी पिशव्यांचे वितरण याप्रसंगी करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा परिषद परिसरात प्लास्टिक कचरा संकलनासाठी महाश्रमदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपवनसंरक्षक श्री विवेक जोशी व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद परिसरात महा श्रमदानातून प्लास्टिक कचरा गोळा केला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप यांनी हातात झाडू घेऊन स्वछतेसाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद परिसर, मिशन स्कूल मैदान, गणेशपूर बाजार परिसर, ग्रामपंचायत परिसरात अधिकारी व कर्मचा-यांनी प्लॉस्टीक कचरा गोळा केला. जिल्हा परिषद ते गणेशपुर ग्रामपंचायत पर्यंत प्लास्टिक कचरा संकलनासाठी स्वच्छता रॅली काढून “प्लास्टिक कचरा टाळा,कापडी पिशव्यांचा वापर करा”,बंद करा बंद करा प्लॉस्टीक वाप बंद करा, प्लॉस्टीक हटवा, रोगराई मिटवा अशा घोषवाक्याने प्लॉस्टीक निर्मुलनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ. सुभाष पवार व विभाग प्रमुखांनी महाश्रमदानासाठी पुढाकर घेतल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शेकडो हात प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी जिल्हा परिषद ते गणेशपूर रस्त्याने एकवटले होते. यावेळी रस्त्याने, आजूबाजूला तसेच बाजार परिसरात, दुकानांलगत, मैदानावरील पडून असलेली प्लॉस्टीक गोळा करण्यात आली. भंडारा येथील प्रगती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थिनी प्रा. पासवन मॅडम यांच्या नेतृत्वात सहभागी झालेल्या होत्या.
प्लॉस्टीक मुक्तीसाठी किराणा व्यावसायीकांशी संवाद
महात्मा गांधी यांच्या 150 जयंती निमित्य घेण्यात आलेल्या महाश्रमदानात जि.प.ते गणेशपूर पर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ. सुभाष पवार यांनी काही किराणा, हॉटेल व्यावसायीकांशी संवाद साधून प्लॉस्टीक वापर टाळण्याबाबत आवाहन केले. प्लॉस्टीक वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होणारे नुकसान, धोक्यात आलेले मानवी आरोग्य याबाबत अवगत केले. किराणा दुकानातून, हॉटेल मधून देण्यात येणा-या वस्तू हया कागदात किंवा कापडी पिशव्यांमध्येच दयावे,असे सांगितले. यावेळी किराणा व हॉटेल व्यावसायीकांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्लॉस्टीक पिशव्या पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगून प्लॉस्टीक निर्मूलनाबाबत समर्थन केले.
इनसॅनेटरी मशिनचा शुभारंभ
आज ग्राम पंचायत गणेशपूर येथे लावण्यात आलेल्या इनसॅनेटरी मशिनचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ.पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मंजुषा ठवकर, गट विकास अधिकारी नुतन सावंत, ग्राम विकास अधिकारी श्याम बिलवने यांची उपस्थिती होती. वापरात येणारे सॅनिटरी पॅड या इनसॅनेटरी मशिनमध्ये नष्ठ करण्यात येणार आहेत.




