गोंदिया दि.5 : गोंदिया विधानसभा मतदार संघासाठी भारत निवडणुक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक शौकत अहमद प्यारे (7820890970) हे निवडणूक संबंधित कामासाठी नागरिकांना भेटण्यासाठी दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय खोली क्रमांक 12, नविन प्रशासकीय ईमारत जयस्तंभ चौक येथे त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहुन मतदारांच्या समस्या ऐकुण घेणार आहे. ज्या नागरिकांना निवडणूक विषयी समस्या असतील त्यांच्या समस्यांची ते सोडवणुक करतील.तरी गोंदिया विधानसभा मतदार संघातील नागरीकांनी त्यांची भेट घ्यावी.
निवडणूक निरीक्षक जिल्हयात दाखल
गोंदिया दि.5 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता भारत निवडणूक आयोगाने जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक जिल्हयात दाखल झाले आहे.जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघाकरीता सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून श्री मंजूर अली (7820879236), 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. राजीव मेहता (7820877981), 65- गोंदिया विधानसभा संघाकरीता श्री शौकत अहमद प्यारे (7820890970), 66- आमगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री धनजंयसिंग भदोरीया (7620752181), पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून 63- अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री धर्मवीर (9454401662),64- तिरोडा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. सुधीर कुमार पोरीका (8344428152), 65- गोंदिया विधानसभा संघाकरीता श्री जी.जी.पांडे (9425060369), 66- आमगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री टी. इक्का (9479190820) यांची नियुक्ती केली . सामान्य निवडणूक निरीक्षक हे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उपस्थित असणार आहेत. निवडणूकीसंबंधी असलेल्या तक्रारी व समस्यांच्या निराकरणासाठी संबंधित मतदारसंघातील नागरिकांनी संपर्क साधावा.





