28.3 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्वच्छता अभियान,सिंगल युज प्लास्टिक निर्मुलन मोहीम

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्वच्छता अभियान,सिंगल युज प्लास्टिक निर्मुलन मोहीम

0
25

वाशिम, दि. ०६ : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. वि. र. मानकर, विभाग प्रमुख डॉ. व्ही. जे. डोंगरे, डॉ. डी. के. गुप्ता, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आर. जी. बिलोलीकर, सहसमन्वयक श्रीमती आर. आर. आढाव, एम. एस. हुले, एस. आर. झुंजारे यांच्यासह संस्थेमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत संस्थेत स्वच्छता अभियान व सिंगल युज प्लास्टिक निर्मुलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी तंत्र निकेतन इमारत परिसर, मुलांचे व मुलींच्या वसतिगृह परिसरातील स्वच्छता करून सिंगल युज प्लास्टिक न वापरण्याची प्रतिज्ञा केली व ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हा मोलाचा संदेश दिला.डॉ. मानकर यांनी स्वच्छतेचे महत्व व सिंगल युज प्लास्टिक वापरण्याचे दुष्परिणाम सांगून सर्वांना प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.