30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ निवडणूक खर्च निरीक्षक श्री रेड्डी व श्री मुकुंदन यांची प्रसारमाध्यम कक्षाला भेट

निवडणूक खर्च निरीक्षक श्री रेड्डी व श्री मुकुंदन यांची प्रसारमाध्यम कक्षाला भेट

0
49

गोंदिया दि.11 : भारत निवडणूक आयोगाने जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक श्यामसुंदर रेड्डी व आमगांव व गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक आर. मुकूंदन यांनी 9 ऑक्टोबर रोजी नवीन इमारतीत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील प्रसारमाध्यम कक्षाला भेट दिली व येथील माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षाची पाहणी केली. यावेळी या कक्षाचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांचेकडून माहिती जाणून घेतली.

प्रसारमाध्यम कक्षात असलेल्या टिव्हीच्या माध्यमातून मराठी बातम्यांचे सॅटेलाईट चॅनल्स व स्थानिक केबल नेटवर्कवरुन उमेदवारांच्या राजकीय बातम्या तसेच राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातीवर बारकाईने लक्ष दयावे. जर जाहिरात असेल तर सदर खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समावेश करावा. प्रादेशिक व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या  पक्ष व उमेदवारांच्या बातम्यांचे अत्यंत सुक्ष्म वाचन करुन संशयीत बातम्या पेडन्यूज प्रकारच्या असल्यास तातडीने समितीपुढे ठेवून त्या बातम्या पेडन्यूज आहेत का याची खातरजमा करुन त्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. वृत्तपत्रात येणाऱ्या राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातीचे शासकीय दरामप्रमाणे किती रक्कम  होते याची माहिती खर्च समितीकडे दयावी. जाहिरात देणाऱ्या उमेदवारांच्या खात्यांमध्ये तो खर्च समाविष्ट करण्यासाठी ॲनेक्चर-12 मध्ये दररोज माहिती भरून निवडणूक खर्च विभागाला सादर करावी असे सांगितले.

यावेळी प्रसारमाध्यम कक्षाचे नोडल अधिकारी श्री खडसे यांनी प्रसारमाध्यम कक्षातून बातम्यांचे सॅटेलाईट चॅनेल तसेच स्थानिक केबलवर लक्ष ठेवण्यात येत आहे. माध्यम  प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून उमेदवारांच्या बातम्यांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून उमेदवारांचे राजकीय जाहिरातींचा खर्च त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत निवडणूक खर्च विभागाला कळविण्यात येतो. उमेदवारांच्या प्रचारासाठी प्राप्त होणाऱ्या ध्वनीचित्रफितीची पाहणी व संहितालेखन वाचून उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारच्या निवडणूक विषयक आचारसंहितेचा भंग होणार नाही तसेच निवडणूक आयोगाच्या अटी व शर्तीचे पालन करण्याची उमेदवारांनी दक्षता घेण्याबाबत कळविले आहे. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या समाजमाध्यम खात्यावर पोलिस विभागाच्या सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे असे सांगितले. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षकांना मॅग्नीफिशंट महाराष्ट्र हे पुस्तक भेट देण्यात आले.