तिरोडा,दि.11ः-पोषण आहारासंदर्भात नागरिकांमध्ये विशेषत: महिला व विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील २७ गावांमध्ये विद्यार्थ्यांची प्रभातफेरी खाद्यपदार्थ प्रदर्शनी, आनंद मेळावा, पोषक खाद्य पदार्थ स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन अदानी फांऊडेशनद्वारा पोषण कार्यक्रमातंर्गत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे औचित्य साधून गावपातळीवर करण्यात आले. याकरीता अदानी फांउडेशनने पुढाकार घेतला आहे.
सदर कार्यक्रम अदानी प्रकल्प प्रमुख कांती विश्वास यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. अदानी प्रकल्पाचे हेड नितीन शिराळकर यांनी माहिती देताना सांगितले की, शरीर निरोगी व सुदृढ राहण्याकरीता पोषण आहार महत्वाचा आहे व त्या संबधी जाणीव जागृती करणे हाच उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमात सुपोषण कार्यक्रमातंर्गत गावपातळीवर कुपोषण दूर करण्याकरीता कार्य करणारी संगीनी यांनी महत्वाची भुमिका बजावली. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने एकूण २७ गावांमध्ये ३१ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ५ हजार ४८८ नागरिक, विद्यार्थी व विशेषत: महिला सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुपोषण कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी स्वप्नील वहाने, प्रिती उके, दिपा बेद्रे, व अदानी फांउडेशनचे सर्व कर्मचारी तसेच जि.प.शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, सरपंच, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा सेविका आदींनी परिश्रम घेतले.





