25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ मतदान जनजागृतीसाठी भंडारा येथे “वॉक फॉर वोट”

मतदान जनजागृतीसाठी भंडारा येथे “वॉक फॉर वोट”

0
30

       लोकशाही बळकट करण्यासाठी विदयार्थ्यांना दिली मतदानाची शपथ
       स्वीप कार्यक्रमातून मतदानाची जनजागृती

भंडारा , दि. 14 –स्वीप कार्यक्रमांतर्गत ‍जिल्हयातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रमाने मतदानाची  व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. 12 ऑक्टोबर 2019 ला भंडारा येथे मतदान जनजागृतीसाठी “वॉक फॉर वोट”  रॅली काढण्यात आली. नगर परिषद भंडारा यांचे वतीने  गांधी चौक ते शिवाजी स्टेडीयम पर्यंत रॅली काढून शि वाजी स्टेडीयम मध्ये समारोप करण्यात आला.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ढेरे,निवडणूकविभाग प्रमुख नागेश कपाटे, शिक्षण  विभागाचे अशोक गोन्नाडे, निखील कामडी, गणेश मुळे, बालाजी माने व नगर परिषद कर्मचारी,  विदयार्थी उपस्थित होते.  गांधी चौक येथून  वॉक फॉर वोट रॅलीला सुरूवात करण्यात आली. मुख्याधिकारी  ज्ञानेश्वर ढेरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. गांधी चौक ते शिवाजी स्टेडीयम पर्यंत शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली  काढण्यात आली. रॅलीत  गांधी विदयालय व उर्दू  हायस्कुलचे विदयार्थ्यी सहभागी झाले होते. नागरिकांनी मतदान प्रकीयेत सहभागी व्हावे या  करिता विदयार्थांनी रॅलीतून मतदानाचे संदेश  दिले.  शिवाजी स्टेडीयम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी श्री ढेरे यांनी,  लोकशाहीला बळकट करण्यासाठी पालक, नवमतदार,दिव्यांग, ज्येष्ठ मतदान यांनी अवश्य मतदान करावे या करिता विदयार्थ्यांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन केले त्यानंतर विदयार्थी व अधिकारी , कर्मचारी यांना मतदानाची शपथ देण्यात आली.