26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय अमोल मिटकरी यांची आज तिरोडा व नवेगावबांध येथे सभा

अमोल मिटकरी यांची आज तिरोडा व नवेगावबांध येथे सभा

0
86

गोंदिया,दि.१४ः-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-रिपाई,स्वाभीमान शेतकरी संघटन पुरस्कृत महाआघाडीचे तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रविकांत(गुड्डु)खुशाल बोपचे व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे स्टारप्रचारक वैचारिक विचारवंत अमोल मिटकरी यांच्या जाहिर संभांचे आज(दि.१४)सोमवारला आयोजन करण्यात आले आहे.तिरोडा येथील जुने नगरपरिषद शाळेच्या आवारात रविकांत बोपचे यांच्या प्रचाराकरीता अमोल मिटकरी यांची दुपारी १ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.तर नवेगावबांध येथे ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.मिटकरी यांच्या सभेला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रेम रहागंडाले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पिरिपा महाआघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.