गोंदिया,दि.15: ओबीसी संघर्ष कृती समिती अंतर्गत ओबीसी सेवा संघ, संविधान मैत्री संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, युवा बहुजन स्वाभिमान मंच, राणी अवंतीबाई लोधी महासंघ व इतर सामाजिक संघटनांच्या झालेल्या बैठकीत ओबीसी बहुजन समाजातील मतदारांनी वैचारिक पातळीवर काम करणाèया तसेच ओबीसी बहूजन धोरणांच्या समर्थनात असलेल्या उमेदवारांना मतदान करण्याविषयी विचार करावा असा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे होते. प्रमुख म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शरद वानखेडे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम. करमकर, युवा बहुजन मंचचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, राणी अवंतीबाई लोधी महासंघाचे शिव नागपुरे, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, महेंद्र कठाणे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव शिशिर कटरे, कैलास भेलावे, चिरंजीव बिसेन, कार्याध्यक्ष अमर वèहाडे उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जो वर्ग उमेदवार ओबीसी, एससी, एसटी,धार्मिक अल्पसंख्याक समाजाच्या संविधानिक हक्काच्या विरोधात आहेत व वेळोवेळी विरोधी भूमिका घेतलेली आहे. अशा उम्मीदवारांना आम्ही का म्हणून सहकार्य करावे, यांना का मत दयावे, जो आमच्या मुला-बाळांच्या भविष्याच्या, रोजगाराच्या विरोधात भूमिका घेत असेल अशा परिस्थितीत आम्हा सर्वांना सुद्धा आपल्या हक्काची जाणीव ठेवणाèया ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्याचा विचार करावा लागेल असा सूर निघाला. गोंदिया विधानसभा मतदार संघात या संदर्भात मतदारांना चिंतन करण्याची गरज झाली असून विचारात्मक चिंतन करुन नवे नेतृत्व परिवर्तनाच्या माध्यमातून करण्यासाठी मतदान करावे असे सर्वानुमते या बैठकीत ठरविण्यात आले.




