30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ डॉ. परिणय फुकेंच्या समर्थनार्थ लाखांदूर तालुक्यात समर्थकांची गर्दी

डॉ. परिणय फुकेंच्या समर्थनार्थ लाखांदूर तालुक्यात समर्थकांची गर्दी

0
33

लाखांदुर,दि.17:- साकोली विधानसभा मतदार संघातील लाखांदूर तालुक्यातील भाजप-शिवसेना रिपाई (आ) महायुतिचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रचारयात्रेस लाभलेल्या जनसागरामुळे लाखांदूरमध्ये सर्वत्र समर्थकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.गावागावात भजन, कीर्तन, भव्य रॅलीच्या माध्यमातून डॉ. फुकेंचे जंगी स्वागत होताना पाहायला मिळत आहे. महिला वर्ग औक्षण करून श्री. फुकेंना विजयीभवचा आशीर्वाद देत आहेत. भाजपा पक्षाच्या उमेदवारास मिळणाऱ्या उत्साहपूर्ण पाठींब्यामुळे जनतेचा पाठींबा भाजपाला असल्याचे स्पष्ट होते.

लाखांदूरच्या असोला, अथली, पहुनगाव, डोका सारंडी, किरमटी, रोहिणी, परसोडी / नाग., दोनाड इत्यादी गावांमध्ये आयोजित जनसभेला संबोधीत असताना डॉ. फुकेंनी मागील सरकारच्या अपयशावर जोरदार टीका करून भाजपाला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यास आशीर्वाद मागितला.यावेळी आमदार बाळाभाऊ काशिवार, वसंतजी इंछिलवार, सरोदे महाराज, वामनभाऊ बोंदरे, नरेशभाऊ खरकाटे, विनोद जी ठाकरे, नूतनभाऊ कांबळे, भोजराजजी कापगते, सुनीलभाऊ भोवते, भारतीताई दिवटे, हरीशभाऊ वाघमारे, प्रियांकजी बोरकर, राजुभाऊ नाकतोड़े, नेहाताई वाघमारे, मिसार मैडम, सोफिया पठान, विकास हटवार यांच्या समवेत हजारो ग्रामवासी, तालुका पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्तिकेन्द्र प्रमुख, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पंस सदस्य, जिप सदस्य, नपं सदस्य इत्यादि उपस्थित होते.