गोंदिया,दि.26 : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर प्रत्येक गावात गर्भवती माता व नवजात बालकांना लस दिली जाते. या लसीकरणाच्या माध्यमातून माता आणि बालकांना नवसंजीवनी मिळत असते. लसीकरणासंदर्भाती माहिती यापूर्वी महिन्याच्या शेवटी पाठविली जात होती. परंतु, आता ही माहिती एका क्लिकवर मिळणार असून, यासाठी इव्हीन ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील लसीची माहीती अपडेट होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गर्भवती माता आणि नवजात बालकांना घटसर्प, धनुर्वात, गोवर, रूबेला, क्षयरोग, कावीळ, पोलिओ इत्यादी बाजार होऊ नये यासाठी आरोग्य सेविका, आशा स्वयं सेविकांच्या माध्यमातून लसीकरण केले जाते. नवजात बाळ पाच वर्षाचे होईपयर्ंत लसीकरण करण्यात येते. मात्र, या लसींची हिशेब जिल्हास्तरावर लवकर जात नसतो. मग तो लस दुसर्या उपकेंद्रात पुरवायची असेल तर जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य वेंष्ठद्रात अशा लसींचा तुटवडा जाणवत असल्याने बर्याच माता व बालक लसीपासून वंचित असतात. लसींचा साठा संपल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तारावर पुरवठा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून इव्हीन प्रणाली महत्वपूर्ण ठरली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कुठे, किती साठा उपलब्ध आहे. किती पुरवठा करावा लागणार, या बाबतची माहिती मिळणार आहे. कोणत्या आरोग्य केंद्रात किती लसी उपलब्ध आहेत. किती वापरण्यात आल्या, याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी आरोग्य कुटूंबकल्याण मंत्रालयाने इव्हीन प्रणाली विकसित केली आहे. त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून करण्यात येणार आहे. पूर्वी लसीकरणाचा आढावा महिन्याच्या अखेरीस घेतला जात होता. महिन्याकाठी ही माहिती भरून पाठविणे अवघड होत होते. त्यामुळे ही माहिती अनेकदा कर्मचारी पाठवित नव्हते. तर काही कर्मचारी त्रोटक माहिती पाठवीत होते. कर्मचार्यांकडून माहिती आल्यानंतर ती विभागीय आयुक्त कार्यालयाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारला सादर केली जायची. याला मोठा कालावधी लागायचा. यामुळे अनेकदा लसीचा तुटवडाही निर्माण व्हायचा. यावर मात करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. तसीकरण सत्र झाल्यानंतर तयाच दिवशी वापरलेल्या लसीची माहिती इव्हीन अँपमध्ये भरून जिल्हास्तरावर द्याची आहे. जेणेकरून जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा साठा प्राप्त होईल. इव्हीन प्रणालीत सर्व लसीची माहिती दररोज भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रणालीचा वापर करून लसीचा साठा किती वापरण्यात आल्या, याची माहिती भरण्याचे प्रशिक्ष्ज्ञण कर्मचार्यांना देण्यात आले आहे. यामुळे ही माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.





