गोरेगाव,दि.31ः- गोरेगाव तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या दिवाळीसणाच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेला धान आणि दमट वातावरणामुळे पिकाला लागलेल्या किडरोगाने धानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने त्वरीत या नुकसान झालेल्या धानपिकाचे पंचनामे करुन भरपाई देण्यात यावे यामागणीचे निवेदन आज(दि.31)गोरेगाव तहसिलदारामार्फेत शासनाकडे तसेच खासदार प्रफुल पटेल, नवनिर्वाचित आमदार मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना पाठविले आहे.निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले,युवक अध्यक्ष बाबा बोपचे,डॉ.रुस्तम येळे,प्रदिप जैन,गणेश रहांगडाले,महेंद्र चौधरी,योगेश चौधरी सरपंच,कोटांगले उपसरपंच, भुपेश गौतम उपसरपंच हिरापूर,डॉ.गणेश रहांगडाले उपसरपंच, घनश्याम पटले,खुशाल वैद्या,घनश्याम तिराले,शामलाल कुमडे,बुधराम भोयर,डाॅ.संजय रहागंडाले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




