27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ भव्य दांडिया स्पर्धेत गडचिरोली दांडिया ग्रुपने मारली बाजी

भव्य दांडिया स्पर्धेत गडचिरोली दांडिया ग्रुपने मारली बाजी

0
34

अर्जुनी मोर,दि.04 : एस. के. एजन्सी व टायगर ग्रुप नवेगावबांध यांच्या संयुक्त विद्यमाने ३0 व ३१ ऑक्टोबरला दोन दिवसीय भव्य दांडीया स्पध्रेचे आयोजन येथील बी.ए.डी.विद्यालयात करण्यात आले होते. स्पर्धेत गडचिरोली दांडिया ग्रुपने उत्कृष्ट प्रदर्शन करुन बाजी मारली. तर सडक अर्जुनी व सेंदूरवाफाचा संघ अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी राहिला.
स्पध्रेचे उद््घाटन जिप सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. अभिमान कापगते होते. यावेळी नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, जिप सदस्य किशोर तरोणे, नितीन पुगलिया, प्रमोद लांजेवार, बबलू शिपानी, शैलेश जयस्वाल, एकनाथ बोरकर, होमराज कापगते, मनीषा तरोने, पंस सदस्य होमराज कोरेटी, लोकपाल गाहणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक जय मातादी दांडिया ग्रुप गडचिरोली यांनी पटकाविले. दुसरे पारितोषिक स्टार ग्रुप सडक अर्जुनी यांनी तर तिसरे पारितोषिक युनिक दांडिया ग्रुप सेंदूरवाफा यांनी पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ११ हजार १११ रुपये, ७ हजार १११ व ५ हजार १११ रुपये रोख पारितोषिक मराठा सेवा संघ गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली, नितीन पुगलिया, मनीषा तरोने, किशोर तरोणे, डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक किशोर तरोणे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार मनीषा तरोणे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील हजारो रसिक उपस्थित होते.