भंडारा, दि. 5 :- महाराष्ट्र राज्याचे राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे 6 नोव्हेंबर 2019 रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा तपशिल या प्रमाणे आहे.6 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय, भंडारा येथील सेतू केंद्रास भेट. दुपारी 12 वाजता नगरपरिषद भंडारा येथे लोकसेवा हक्क कायदा प्रभावी अंमलबजावणीची पाहणी करतील. दुपारी 12.30 वाजता जिल्हा परिषद भंडारा येथे लोकसेवा हक्क कायदा प्रभावी अंमलबजावणीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख भंडारा येथे लोकसेवा हक्क कायदा अंमलबजावणीची पाहणी करतील. दुपारी 3 वाजता जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांची लोकसेवा हक्क कायदा अंमलबजावणी अनुषंगाने आढावा बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी 7.30 वाजता नागपूर येथे आगमन व मुक्काम.




