गोंदिया, दि.6: बाजमजुरी ही अनिष्ठ प्रस्था असून त्याचे राज्यातून समुळ उच्चाटन करुन बालमजुरांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ करुन घेणे व त्यांचा वैयक्तिक विकास घडवून आणण्याकरीता तसेच या बालकामगार प्रथेविरुध्द जिल्ह्यात जनजागृती करण्याकरीता राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत जिह्यात बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान राबवण्यासाठी तसेच त्यामध्ये समाविष्ट विविध कार्यक्रमाची रुपरेषेच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत विविध कार्यक्रमानुसार बालकामगार क्षेत्र निश्चित करणे, हॉटेल असोशिएशन बैठक आयोजित करणे, बालकामगार रॅली, मालक संघटनांची बैठक, बालकामगार विषयावर विविध प्रतियोगिता, बालकामगार क्षेत्रामध्ये जनजागृती करणे, बालकामगार विषयी शपथ इत्यादी कार्यक्रम जिल्हा बालकामगार कृती दल समिती व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक व्यापारी संघटना, कामगार संघटना यांचे प्रतिनिधी यांना बालकामगार प्रथेविरुध्द जिल्ह्यात 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत बालकामगार प्रथेविरुध्द राबविण्यात यावयाच्या विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बालकामगार विषयी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, खोली क्रमांक 35, तिसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे किंवा कार्यालयातील भ्रमणध्वनी क्रमांक 7218168141 यावर संपर्क साधावा.





