सडक अर्जुनी,दि.०८ः तालुक्यातील कोयलारी (शेंन्डा) येथे कार्तिक उत्सव व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळयाचे अनावरण माजी सामाजिक न्यायमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना बडोले म्हणाले की, ग्रामगिता केवळ आध्यात्मिकच नव्हे तर भौतिकदृष्टया सुखी होण्याचे मार्ग दाखविते.महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून वंदनीय तुकडोजी महाराजांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते.एवढेच नव्हे तर त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.अंधश्रध्दा आणि जातीभेद मिटावे,ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे यासाठी तुकडोजी महाराजांनी अविरत प्रयत्न केल्याचे सांगितले.
इंजि. बडोले पुढे म्हणाले,कार्तिक या शब्दाचा अर्थ म्हणजे आनंद, रस, प्रसन्नता, पराक्रम, प्रताप, हिम्मत आणि दिलेरी द्विगुणीत करणे असा आहे आणि कार्तिक महिना हा हे गुण जपण्यासाठी व त्याची जाणीव होण्यासाठी आहे.आयुष्यातील मरगळ झटकून कामाला लागणे व स्वतः सोबत इतरांना उज्वल बनवणे हा त्यामागच हेतू असल्याचे सांगितले.याप्रसंगी उपस्थित गिरधारी हत्तीमारे (सभापती पं.स. सडक अर्जुनी),राजेश कठाणे (उपसभापती पं. स. सडक)शेषराव गि-हिपुंजे,जिवनलाल लंजे,ह.भ.प.कुमार फुंडे महाराज गुरूकुजं मोझरी,बळीराम पाथोडे महाराज,महेंद्र रहेले,कविता रंगारी,पदमा परतेकी (माजी पं.स.सभापती सडक अर्जुनी),गिता कापगते,जिजा पाथोडे,फुलन धुर्वे, ललित डोंगरवार,कैलाश भेंडारकर,जागेश्वर पाथोडे,रोशन शिवणकर आदी मान्यवर व कोयलारी ग्रामवासी उपस्थित होते..





