24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ स्थायी समितीच्या सभेत जि.प.अध्यक्षासह सभापतीच्या राजीनाम्याची मागणी

स्थायी समितीच्या सभेत जि.प.अध्यक्षासह सभापतीच्या राजीनाम्याची मागणी

0
30

गोंदिया,दि.08 : नुकत्याचा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या झालेल्या (दि.7)सभेत राजकीय घडामोंडीसह काँग्रेसच्या जि.प.अध्यक्षासंह सभापतीवर पक्ष विरोधी कार्य केल्याने त्यांना निलबिंत करण्यात आल्यामुळे नैतिकेतेच्या आधारावर या पदाधिकारीनी राजीनामा द्यावा असा सुर या सभेत चर्चैदरम्यान निघाल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार गोपाल अग्रवालसह जि.प. अध्यक्ष  सीमा मडावी तसेच १ सभापती, ३ सदस्यांनी भाजपचे मंच गाठले. त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्यामुळे प्रदेश काँग्रेस कमेटीने जि.प.अध्यक्षासंह सभापती व जि.प.सदस्यांना निलंबित केले आहे.त्यामुळे नैतिक जबाबदारी पाळून अध्यक्ष व सभापतींनी जि.प.च्या पदाचा राजिनामा द्यावा, अशी  मागणीच पी.जी.कटरे यांनी केली.ही चर्चा स्थायी समितीच्या सभेत सुरु असताना जि.प. अध्यक्ष सिमा मडावी यांनी काही भाष्य करने टाळले. तर शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी त्यावर आक्षेप घेत आम्ही कुठल्याही पक्षात गेलो नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. या चर्चेसह जवळपास १ तास चाललेल्या सभेला अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जि.प. अध्यक्ष सिमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. मागील सभेचे इतवृत्त वाचनासह प्रस्तावित ठरावाला मंजुरी देण्यात आली. यानंतर गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, त्याच प्रमाणे पाखड झालेला धान आधारभूत किंमतीतच खरेदी करण्यात यावा, असा प्रस्ताव  जि.प.सदस्य पी. जी. कटरे, गंगाधर परशुरामकर यांनी मांडला. यानंतर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या पदाधिकार्‍यांनी सक्रीयतेने सहभाग घेतला. त्या-त्या पदाधिकार्‍यांचे समर्थक उमेदवार विजयी  झाले. व ज्या पदाधिकार्‍यांचे समर्थक उमेदवार पराभूत झाले. मात्र त्यांचा सक्रीय सहभाग अभिनंंदनीय असल्याचे मनोगत व्यक्त केले. त्याच प्रमाणे वृत्त पत्राच्या माध्यमातून जि.प. अध्यक्ष सिमा मडावी, सभापती रमेश अंबुले यांच्यासह एकून ५ जि.प.सदस्यांनी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाविरुद्ध कामगिरी केल्याच्या कारणावरून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. हे योग्य असेल तर जि.प.च्या पदाधिकार्‍यांनी नैतिक जबाबदारी पाळून पदाचा राजीनामा द्यावा, अशी चर्चा  जि.प. सदस्य पी.जी. कटरे यांनी  घडवून आणली. दरम्यान जि.प. अध्यक्ष सिमा मडावी यांनी या चर्चेत सहभागी होण्यास टाळले. तर दुसरीकडे जि.प.सभापती रमेश अंबुले यांनी सभागृहात आम्ही माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पाठिशी उभे होतो मात्र पक्ष सोडले नाही. किंबहूना पक्षाने देखील अद्यापर्यंत निलंबनाचे नोटीस दिले नाही,  ही बाब मांडून चर्चेच्या प्रश्नाला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावर जि.प. सदस्य पी.जी. कटरे यांनी ज्या प्रमाणे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आमदारकी आणि पक्षातील सक्रीय सदस्याचा राजिनामा सादर केला होता, त्या प्रमाणे काँग्रेस विरोधी कामगिरी केलेल्या पदाधिकार्‍यांनी देखील नैतिकतेच्या आधारावर राजिनामा दिला पाहिजे,असा सल्ला दिला. एकंदरीत २ तास चाललेल्या सभेत पक्ष विरोधी कामगिरी आणि विधानसभा निवडणुकीत बदलते राजकीय समिकरणावर चर्चा झाली.

blank