23.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ बालकांचे हक्क व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कायद्याचे पालन करा- नारनवरे

बालकांचे हक्क व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कायद्याचे पालन करा- नारनवरे

0
63

गोरेगाव,दि.23 : कायदा हा माणसाला हक्क, सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आहे. त्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहे. गुन्हा सिध्द झाल्यास शिक्षा आहे. कायदा सर्वांसाठी असून बालकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहे. त्यांचे हक्क व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी कायद्याचे पालन करा असे मत प्रभारी पोलिस निरिक्षक सुरेश नारनवरे यांनी व्यक्त केले.
ते चोपा येथील रवींद्र विद्यालय व क.महाविद्यालयात १९नोव्हेंबर रोजी बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह निमित्ताने गट साधन केंद्र, बाल विकास प्रकल्प व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क व सुरक्षितता मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डी.एच.भगत, प्रमुख मार्गदर्शक विषयतज्ज्ञ जे.एस.राणे होते. तर ओ.एस. ठाकरे, एस.आर. खोब्रागडे, पो.नि. सुरेश नारनवरे, प्रा.ए.जे.मेश्राम  प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन टी.एस. उके यांनी केले. यावेळी विषयतज्ञ जे.एस.राणे, ओ.एस.ठाकरे, एस.आर. खोब्रागडे यांनी बालन्याय, जगण्याचा अधिकार, बालमजुरी, लैंगिक गुन्हेगारी, शिक्षणाचा अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षिय भाषणात प्रा.डी.एच.भगत यांनी विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेल्या सर्व माहिती च्या आधारावर शिस्तबद्ध शिक्षण घेतल्यास तुमचे भावी जिवन सुखकर,आनंदी होण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही.