गोंदिया दि.: 29: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांचे संयुक्त वतीने जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.पराते यांचे अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.पराते यांनी सर्व उपस्थित न्यायीक अधिकारी, वकील मंडळी, पॅनेल वकील, विधी स्वयंसेवक तसेच न्यायीक कर्मचारी यांना संविधान दिनानिमित्त सकाळी 11 वाजता शपथ दिली.
जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.जी.जोशी यांनी संविधानात दिलेले मुलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वांचा न्यायदानात उपयोग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एन.आर.वानखडे यांनी संविधान उद्देशिकांचे विश्लेषण या विषयावर तर चवथे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व्ही.आर.मालोदे यांनी भारतीय राज्यघटना या विषयावर उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले.कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-2 ए.जी.जोशी, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एन.आर.वानखडे, जे.एम.चव्हाण, आर.डी.पुनसे, व्ही.आर.आसुदानी, वासंती मालोदे, पी.सी.बच्छेले, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे तसेच सर्व वकील मंडळी, पॅनेल वकील, कर्मचारी वर्ग, विधी स्वयंसेवक उपस्थित होते.संचालन ॲड.रंजीता शुक्ला यांनी केले, उपस्थितांचे आभार ॲड.प्रणिता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरीकर, जी.सी.ठवकर, एस.एम.कठाणे, एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, एस.एस.पारधी, गुरुदयाल जैतवार, मुलचंद कापसे, पी.एल.व्ही.गोंदिया यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद विद्यालय नवेगावबांध येथे संविधान दिवस उत्साहात साजरा.
नवेगावबांध -जिल्हा परिषद हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव बांध येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोज मंगळवारी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य ए. के. झेलकर सर तर प्रमुख अतिथी म्हणून विदयलायचे सन्मानित शिक्षक सौ एम. व्ही. टाकसाळे,राजेंद्र बावनकर, राजीब बोरकर,पुरुषोत्तम महारवाडे ,वंजारी सर ,सतीश कुंभरे, माया लाडे,रीना पर्वते,नगमा साखरे,स्नेहा खोब्रागडे, मनीषा बाळबुधे उपस्थिती होते. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधानाला दीपप्रज्वलीत करून व पुष्पहार अर्पण करून त्यांनाअभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य झेलकर सर यांनी तसेच अतिथीनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी व्ही राठोड सर यांनी केले,पी. आर. मारवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
जमुनाबाई मतिमंद शाळेत संविधान दिवस साजरा वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नवेगावबांध-स्वर्गीय जमुनाबाई निवासी मतिमंद शाळा उमरी येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीग्रह अधीक्षिका जयश्री कडू ह्या होत्या. यावेळी सी.डी. लांजेवार ,एस. डी. जगणे, परिचारिका एस. एस. साखरे, विशेष शिक्षक एस. एस. दिघोरे अतिथी म्हणून उपस्थित होते.उपस्थितांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. गावातून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथींचे समयोचित भाषणे झालीत.कार्यक्रमाचे संचालन बी डी कुंभरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एस. ए. राणे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
महिला – पुरुषांनी केले संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
नवेगावबांध-नगर बौद्ध समाज नवेगावबांध च्या वतीने संविधान दिवसाचा 70 वा वर्धापन दिवस येथील समाज मंदिरात सायंकाळी7.00 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूलचंद गुप्ता हे होते.यावेळी पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे,प्रा.दिनेश जांभुळकर, प्रा. मोतीलाल शिवहरे,प्रा.शालिनी लांजेवार,दिलीप पोवळे,सपना शामकू वर, बनसोड,ग्रामपंचायत सदस्य शीतल राऊत,सविता बडोले, लिलाबाई सांगोळाकर,माजी जि.प.सदस्य विशाखा साखरे, नीलकंठ कुंभरे, संजीव बडोले,नंदकुमार उके,ग्रामसेवक नरेश बडोले, चुंनीलाला शहारे देविदास बडोले सतीश टेंभुरने उपस्थित होते.प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिथींचे यावेळी संविधानाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत. यावेळी उपस्थित नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सांगोळाकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.ए. रंगारी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सरगम शहारे यांनी मानले.कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास शहारे जगदीश सहारे,अंकित शहारे,प्रभूदास जनबंधु,योगेश बडोले,उमेश बडोले,रुपेश संगोळाकर यांनी सहकार्य केले.
सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा.
नवेगावबांध-सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी साडेअकरा वाजता संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णी हे होते. यावेळी अतिथी म्हणून जे. एस. हटवार के. एम. भैसारे, एम. यु. घरोटे,आर.के. खेडकर उपस्थित होते.प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधानाला दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अतिथींचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन एस. व्ही. बडोले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एच. एस. पात्रीकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र साखरे, बापू पंचलवार, राकेश वालदे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.




