29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ KTS तसेच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे कायापालट करण्यासाठी कटिबद्ध : आ.अग्रवाल

KTS तसेच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे कायापालट करण्यासाठी कटिबद्ध : आ.अग्रवाल

0
50
गोंदिया,दि.04 : मागील 25 वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या KTS तसेच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या कायापालट व आवश्यक त्या बदलासाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने  KTS रुग्णालयात आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी KTS तसेच बाई गंगाबाई स्री रुग्णालयाच्या विविध समस्या आमदारांनी जाणून घेतल्या. गेल्या 25 वर्षांपासून रुग्णालयाकडे प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे रुग्णालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. मात्र गोंदिया विधानसभेचे नवनियुक्त आमदार विनोद अग्रवाल यांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय तसेच KTS रुग्णालयातील व्यवस्था सुरळीत करणे हे प्राधान्यक्रमावर असल्याचे बोलून दाखवले तसेच येत्या 5 वर्षात योग्य तो पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी भावना व्यक्त केली.
आढावा बैठकीत मधे औषध पुरवठा, वेयरहाऊस तसेच इतर विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात जागेची पाहणी करून नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील आमदारांनी केल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, डॉ. दिलीप गेडाम, डॉ. संजय माहुले, जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. भूषण रामटेके, डॉ. सुवर्णा हुबेकर, फार्मासिस्ट श्री. सिंग, औषधी अधिकारी  निलेश उके तसेच जिल्हा नियोजन अधिकारी तर्फे श्री. भीमटे, दुबे, डॉ. गौरव बग्गा, डॉ. गरीमा बग्गा,श्वेतलाल माहुले, श्री. प्रदीप ढोके, अपर्णा जाधव, गायत्री धाबेकर, निलेश राणे उपस्थित होते.

blank