30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ कारंजा येथे शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली

कारंजा येथे शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली

0
40

गोंदिया,दि. ४: तालुक्यातील कारंजा येथे श्रीकृष्ण मंदिर आखर पटांगणात आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने ११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मंचावर आदिवासी गोवारी समाज समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव नेवारे, कारंजाची सरपंच उपराडे, मारूती भिमटे, राधेश्याम कोहळे, डॉ. मदारकर, युवा ब्रिगेड आदिवासी गोवारी मंचचे प्रमोद शहारे, संजय राऊत, प्रविण चौधरी, विजय भोयर, गुड्डू वघारे उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी गोवारी जमातीने आपली संस्कृती जोपासणे फार गरजेचे आहे. आदिवासींच्या निष्कर्षावर खरे उतरायचे असेल तर संस्कृतीचे पालन करावेच लागेल व ती जोपासावीच लागेल असे मत व्यक्त करीत समाजाने आज घडीला शिक्षणावर भर देवून आपले पुढचे आयुष्य सुधारण्याकरिता प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी आखर पटांगणाच्या जागेवर आदिवासी शहीद गोवारी स्मारक बांधण्याची मागणी करण्यात आली. ती आपण प्रयत्न करून पूर्ण करणार असल्याचे आश्वासन यावेळी सरपंच उपराडे यांनी दिले. कार्यक्रमालाचे विजय वाघाडे, राजू शहारे, दिपचंद कोहळे, शैलेष शेंद्रे, नवजीवन शेंद्रे, विजय नेवारे, राजेश भिमटे, विनोद वाघाडे, जितेंद्र राऊत, अतुल चौधरी, लोकेश भिमटे, सोमेश्वर वाघाडे, अरूण राऊत, मुलचंद राऊत, रमेश शेंद्रे, मिताराम हरडे आदी उपस्थित होते.

blank