वाशिम, दि. 05 : जलसंसाधन, नदी विकास व गंगा पुर्नजिवन विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्यावतीने द्वितीय राष्ट्रीय जल पुरस्कार-2019 देण्याचे नियोजित आहे. हा पुरस्कार एकूण 13 घटकानुसार देण्यात येणार आहेत. यामध्ये अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचे नुतनीकरण व नवीन जलस्त्रोतांची निर्मीती करुन जतन करणे हे उद्दीष्ट आहे. जलस्त्रोतांचा प्रभावीपणे वापर व जलस्त्रोतांबाबत जनजागृत्ती करणे हे ध्येय आहे.
या पुरस्काराकरीता केंद्र शासनाच्या www.cgwb.gov.in/ www.mygov.in संकेतस्थळावरील मार्गदर्शक सुचनेनुसार उत्कृष्ट जिल्हा, ग्रामपंचायत, नगरपालीका,शाळा/ महाविद्यालय, वैयक्तिक/संस्था, निवासी कल्याण संस्था व उद्योगाकरीता प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्याचे नियोजित आहे. हा पुरस्कार अनुक्रमे 2 लक्ष रुपये, 1.50 लक्ष आणि 1 लक्ष रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्काराकरीता जिल्ह्यातील वरील घटकांना आवाहन करण्यात येते की, पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार करुन परस्पर 31 डिसेंबर 2019 पर्यंत वरील संकेतस्थळावर केंद्र शासनास पाठविण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.





