मोहाडी,दि.17ः-विकास आघाडी फाऊंडेशन जिल्हा भंडारातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयसमोर माजी आ.चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना पाठविण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, सभापती विशाखा बांडेबुचे, उपसभापती उमेश पाटील, जि. प. सदस्य राणी ढेंगे , चंदू पिलारे, पं. स. सदस्य हरिश्चंद्र बंधाटे, विलास गोबाडे, जगदीश ऊके, निशा कळंबे, भारत टेकाम , सुभाष गायधने, यादोराव कुंभारे, हिरालाल रोटके, सरपंच दिगंबर कुकडे, शंकर आचरकाटे, भाऊराव तुमसरे आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देवून सातबारा कोरा करावा, पीकविम्याची रक्कम शासन निर्णयाप्रमाणे शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावी, विलंब झाल्यास विम्याच्या रकमेसहीत व्याज देण्याचे बंधनकारक असूनही मागील पीक विम्याची रक्कम अद्द्याप पयर्ंत शेतकर्यांच्या खात्यात जमा न झाल्याने व्याजासहीत रक्कम अदा करण्यात यावी, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच इतर मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.





