40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ नागपूरच्या महापौरांवर जीवघेणा हल्ला

नागपूरच्या महापौरांवर जीवघेणा हल्ला

0
26

नागपूर,दि.18- नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामुळे नागपूर गाजत असतानाच दुसऱ्या एका घटनेने नागपूर हदरले आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर काल(मंगळवार) रात्री गोळीबार झाला आहे. जोशी यांच्या गाडीवर मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या गोळीबारात संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असलं तरी, अनधिकृत बांधकांमांविरुद्ध जोशींनी केलेल्या कारवाईमुळे हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.