रयतच्या महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा -वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

0
45

गडचिरोली,दि.30:- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत जानेवारी 2020 मध्ये महाविद्यालयीन प्रश्न मंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रश्नमंजूषा स्पर्धा एस.एम. जोशी कॉलेज हडपसर , पुणे स्पर्धा कालावधी दिनांक 16 जानेवारी 2020 ते दिनांक 18 जानेवारी 2020 पर्यंत राहील.पारितोषिके पुढील प्रमाणे-प्रथम पुरस्कार रुपये 10,000 व स्मृतिचिन्ह, द्वितीय पुरस्कार रुपये 9,000 व स्मृतिचिन्ह, तृतीय पुरस्कार रुपये 8,000 व स्मृतिचिन्ह, 4) व उत्तेजनार्थ  रुपये 7,000 व स्मृतिचिन्ह  5) उत्तेजनार्थ रुपये 6,000 व स्मृतिचिन्ह देण्यात येईल.

वक्तृत्व स्पर्धा- यशवंतराव चव्हाण ऑफ सायन्स कॉलेज, सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा कालावधी दिनांक 22 जानेवारी 2020 ते 24 जानेवारी 2020 पर्यंत आहे. पारितोषिके प्रथम पुरस्कार रु.15,000 व कायमचा चषक,द्वितीय पुरस्कार रु. 10,000 व स्मृतिचिन्ह तृतीय पुरस्कार रु. 5,000 व स्मृतिचिन्ह सांघिक पारितोषिक कायमचा चषक खास पारितोषिक रु.3,000 उत्तेजनार्थ 10 पारितोषिके व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धाचे नियम , अटी  ई माहिती www.erayat.org  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे प्रा.आर. के. शिंदे कार्यकारी संचालक यांनी कळविले आहे.