विविध विभागांच्या समन्वयातून रस्ते अपाघात कमी करण्यासाठी नियोजन

0
18

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

गडचिरोली,दि.30:  मा. सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपन्न झाली. जिल्हयातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागांसह जिल्हयातील इतर महत्वाच्या विभागांच्या समन्वयातून नियोजन केले जाणार आहे. 2019 या वर्षात 140 नोंदविलेल्या आपाघातांमध्ये 140 लोक मृत्यूमुखी पडले तर 165 जण जखमी झाले. याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मोटार वाहन विभागाचे रविंद्र भूयार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी समितीच्या कामाकाजाबाबत माहिती सादर केली.ही बैठक निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय इत्यादी विभागांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत निवासी उपजिल्हधिकारी यांनी रस्ते दुरुस्ती बाबत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या. यावेळी त्यांनी तातडीने विविध माहिती, अपघात सूचना व उपाययोजनेबाबत माहिती मिळण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी हॉटस ॲप गट तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ते म्हणाले की चालकांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी 2020 या दरम्यान 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जात आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील सर्व शासकीय विभाग, निमसरकारी संस्था व सेवाभावी संस्था यांचे मार्फत जनप्रबोधनाचे व्यापक कार्यकम जिल्हाभर राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच 10 टक्के रस्ते अपघात कमी करण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याविषयी विविध विभागांना सुचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांविरुध्द पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनी संयुक्तीक मोहिम राबवावी. तसेच असंरक्षित वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही जारी केलेची माहिती यावेळी रविंद्र भुयार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.