गुजरीसाठी निर्धारीत जागेत बदल करण्याची मागणी

0
24

सालेकसा,दि.31 – सालेकसा नगर पंचायतीच्यावतीने येत्या गुरुवारपासून गुजरी बाजार सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असून हा बाजार तहसिल कार्यालय परिसरात भरविण्यात येणार आहे.यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविला असून गुजरी बाजार सुरु करण्यास आमची हरकत नाही, मात्र बाजाराची जागा योग्य नसल्याने त्या जागेत बदल करण्यात यावे या मागणीचे निवेदन नागरिकांनी तहसिलादारांना सादर केले आहे.
गुजरी बाजारासाठी निर्धारीत केलेली जागा ही खेळाच्या पटांगणाची असून शेजारीच शासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालय असल्याने विद्याथ्र्याना याचा मोठा त्रास होणार आहे.आठवडी बाजाराची जागा निश्चित असून सालेकसा येथे रिक्त जागेचा अभाव आहे.
आठवडीबाजारात आधीच ओटे तयार करण्यात आले असून ते दुकानदारांना सुद्दा सोयीस्करपणे व्यापार करण्यास होणार असल्याने गुजरी बाजाराच्या जागेत बदल करण्याचा विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी वासुदेव चुटे, मनोज डोये, शैलैश बहेकार, कैलाश गजभिये, राजेश हुकरे,ब्रम्हानंद ब्राम्हणकर, रंजीत जनबंधु, संजय हुकरे,महेन्द्र बोपचे, रवि चुटे, वलथरे, भोजराज बागडे, सुरेंद्र डोये, जितेंद्र शेण्डे, गुड्डू चकोले, अजित डोये, अविनाश बोहरे, बालु मेंढे, खेमराज हेमने,जगदीश शेण्डे आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.