अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.04ः– पंचायत समितीच्या सभापतीसह सदस्यांनी कार्यालयात वेळेवर न येणे व कामात हलगर्जीपणा करणे यामुद्याला घेऊन स्वतःलाच कार्यालयात कोंडून घेतले आहे.या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड यांनी समजूत घालून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु सभापतीनी ठाम राहण्याची भूमिका घेतल्याने रात्रही पंचायत समिती कार्यालयात काढावे लागणार आहे.अर्जुनी-मोर पंचायत समिती च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार पणा मुळे आज तीन जानेवारीला आंदोलन करण्याचा ईशारा यापूर्वीसुद्धा पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला होता.
नक्षलग्रस्त आदिवासीबहुल दुर्गम असा तालुका म्हणून अर्जुनी-मोर तालुक्याची शासन दरबारी नोंद आहे विकासाची अनेक कामे या तालुक्यात धुळखात पडलेली आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद पंचायत समिती व गाव स्तरावर ग्रामपंचायत अशी व्यवस्था असून या व्यवस्थेच्या माध्यमातून खेडे गावांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामस्थ यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची असते मात्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्य प्रणालील कंटाळूनच पंचायत समिती सभापती व पंचायत समिती सदस्य गण यांच्यावर आंदोलन करण्याची पाळी आली आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहात सुचविलेली कामे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्य रीतीने हाताळली जात नाही बाल विकास प्रकल्प महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कृषी समाजकल्याण व इतर विभागांचे कर्मचारी मनमर्जी नेक कामकाज करतात अशा चुका सुधारण्यासाठी वेळोवेळी निर्देश देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामचुकार पणाला कंटाळून 27 डिसेंबर च्या पंचायत समितीच्या मासिक सभेच्या बैठकीतून सत्ताधार्यां सह विरोधकांनी सभात्याग करून तीन जानेवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले होते.त्यामध्ये पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात येणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत काही दिवसापूर्वी बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून तालुक्यातील काही अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी खोटे गुण प्रमाणपत्र व प्रगती पत्र तयार करून भरतीमध्ये चुकीचे गुणदान केले होते 18 डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करून तात्काळ 21 डिसेंबरला आदेश दिले विशेष म्हणजे या भरती प्रक्रिया पंचायत समितीने स्थगिती दिली होती ती मात्र बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी स्वमर्जीने नियुक्ती आदेश देऊन पंचायत समितीच्या घेतलेल्या ठरावाला केराची टोपली दाखविली होती.त्यातच 26 डिसेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात नवनियुक्त आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी घेतलेल्या आढावा सभेत हा विषय चर्चेला आला होता मात्र त्यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही महत्त्वाचे विषय असतांनासुद्धा प्रकल्प अधिकारी सभेला उपस्थित राहत नाही त्यामुळे खऱ्या लोकांवर अन्याय झाला आहे तसेच माहूरकुडा व शिरोली येथील ग्राम सेविकेने पंचायत समिती सदस्य कडूनच चुकीच्या व मर्जीने अधिकार पट्टी वसुली केली नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र न देता टोलवाटोलवी करणे झांसी नगर येथील ग्रामसेवकाची कुंभी टोला येथे 5 महिने होऊन सुद्धा स्थानांतरण होत नाही अशाप्रकारची मग्रारोहयो विभागात क र्मचार्यांकडून कामात दिरंगाई करून नागरिकांना ताटकळत ठेवले जाते अश्या एकापेक्षा एक समस्या असताना सुद्धा कर्मचारी व अधिकारी यांच्या दिरंगाई ग्रस्त कार्यप्रणाली ला कंटाळून आज 3 जानेवारी 2020 ला पंचायत समिती पदाधिकारी आंदोलन करणार असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिले होते पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे





