यवतामाळ झेडपीचे सीईओ पत्की नवे जिल्हाधिकारी
गोंदिया,दि.२३ः गेल्या ५ एप्रिल २०२६ रोजी गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डाॅ.मंगेश गोंदावले यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली करण्यात आली असून गोंंदियाचे पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश आज २३ जून रोजी काढण्यात आले आहे.तर डाॅ.मंगेश गोंदावले यांना छत्रपती संभाजीनगर येथील (नवीन शहरे)सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून पाठविण्यात आले आहे.
डाॅ.गोंदावले यांचा पारदर्शक कारभार पालकमंत्र्यांना व गोंदिया जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना न आवडल्याने एका अर्थशास्त्राच्या अभ्यासक अधिकार्याची उचलबांगडी लोकप्रतिनिधींनी केल्याची चर्चा सुरु झाली आहे.डाॅ.गोंदावलेनी येताच जिल्ह्यातील अर्थकारण आणि विकासात्मक बाबीवर मत मांडतांना पाहिजे तसे विकास दर व जिल्ह्यातील उत्पादनांना ओळख मिळवून देण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. मंदार पत्की हे महाराष्ट्र केडर 2020 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवचे (IAS) अधिकारी आहेत. ते सध्या यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.





