गोंदिया,दि.17ः- आदर्श तेली समाज सेवा समिती महिला मंचच्या वतीने उद्या शनिवारला (दि.18) छोटा गोंदिया येथील तेलघानी मंगल कार्यालय येथे सकाळी 9 वाजता समाज महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन स्मिता हटवार यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी माधुरी भेलावे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून निशा भुरे, रत्नमाला शाहू, मालती कापसे, पारबता घारपिंडे, डॉ. अपर्णा खोब्रागडे उपस्थित राहणार आहेत.दिप प्रज्वलन यामिनी धुर्वे, पायल भेलावे, विणा कापसे, डॉ. सुवर्णा हुबेकर, आशा पाटील, उषा तुळसकर, पुष्पा वंजारी, डॉ. यामिनी येरणे यांच्या हस्ते होईल. यशस्वितेसाठी माधुरी भेलावे, माधुरी निखाडे, सुरेखा गायधने, प्रिती पाटील, शारदा समरीत, माधुरी हटवार, सुहानी पाटील, राजेश्वरी चामट, विणा साकुरे, सुशिला भेलावे, किर्ती वंजारी, प्रतिमा आकरे, मेघा वंजारी, सुनिता भेलावे, कुमुदिनी सुपारे, हर्षा पाटील, विणा भेलावे, मोना बडवाईक, धनेश्वरी कुंभलकर, रिना भोंगाडे सहकार्य करीत आहेत. कार्यक्रमाला तेली समाजातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श तेली समाज सेवा समिती महिला मंचाने केली आहे.




