रानडुकराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी

0
10

देवरी दि.१५: जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या दोन महिलांवर रानडुकराने हल्ला करून त्यांना जखमी केले. शुक्रवारी (दि.१५) सकाळी पालांदूरच्या जंगलात ही घटना घडली असून दोघींना ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वीणा यादवराव रामटेके (४0) व ज्योती पंढरी शेंडे (३५, रा. पालांदूर) या गावाजवळील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. जंगलात त्यांना १0-१२ रानडुकरांचे कळप दिसून आले. तर कळपातीलच एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवून पायावर वार केला. यात दोघींच्या पायांना चांगलात मार लागला असून त्या जखमी झाल्या. त्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले आहे.विशेष म्हणजे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जाणार्‍या मजूरांवर जंगलात रानडुकरांकडून अशाप्रकारे हल्ले नेहमीच होत आहेत. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.