‘बोनस म्हणजे पुन्हा भाजपचा खोटारडेपणा’

0
7

सालेकसा ता.२3: मोदी सरकारने बोनस देण्याचे अधिकार राज्याकडून काढले असताना व बजेटमध्ये तरतूद नसताना राज्य सरकार शेतकर्‍यांना कशी काय मदत देणार. त्यामुळे प्रथम राज्य सरकारने सांगावे केंद्राने राज्याला बोनसचे अधिकार दिले काय, त्यात खरीप ला मदत देणार की येणार्‍या रबीला याचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे तरतूद नसताना बोनस म्हणजे भाजपचा खोटारडेपणा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी केले.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला घेऊन आयोजित सालेकसा तालुका ग्रामपंचायत कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, आदिवासी नेते रमेश ताराम, माजी सभापती तुकाराम बोहरे, माजी महिला अध्यक्ष दुर्गा तिराले यांनी मार्गदर्शन केले.बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शदर पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून नान्हवा येथील विनोद चव्हाण व रंजीत बडोले यांनी आपल्या सर्मथकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे विजय शिवणकर व नरेश माहेश्‍वरी यांनी स्वागत केले. संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य बिसराम चज्रे यांनी केले. सभेला लक्ष्मण नागपूरे, रामेश्‍वर पंधरे, ओप्रकाश पारधी, निर्दोष साखरे, अभिषेक चुटे, रवींद्र चुटे, संतोष नागपूरे, रघूदास नागपूरे, महेंद्र कुराहे, मनोज शरणागत, बालमुकुंद शेंडे, लालदास दशरिया, कैलाश धामडे, गोपाल विराले, मनिष पुसाम, देवेंद्र उईके,मनोज शिवणकर, हृषीकेश मेश्राम, दिलीप पटले, योगेश फुंडे, रविंद्र पटले, सोमकार मडावी, केवलराम, उईके, केवल कुनेरे, निकेश गावड, प्रेमचंद लिल्हारे, संतोष रहांगडाले, बघेले इत्यादी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.